प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - जेष्ठ समाजसेवक सन्माननिय स्व. डाँ. बाबा आमटे यांचे सुप्रशिध्द निसर्गरम्य असलेल्या सोमनाथ (मारोडा त.मुल) येथे वर्ष २००१-१००३ ची बँच सुरभी कृषी विद्यालय, सावली जि.चंद्रपुर येथील विध्यार्थी (मित्र-मैत्रीनी) यांचा "स्नेहभेटीचा कार्यक्रम" दि.२६.१२.२९२१ रविवारला आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने शिक्षणाचे शिल्पकार डाँ. पंजाबराव देशमुख साहेब व डाँ. खत्री साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आमचे काही मित्र - मैत्रीनी मृत्यु पावल्याने त्यांच्या आतम्यास शांती मिलो यासाठी दोन मिनिटांची श्रदांजली अर्पण करून " स्नेहभेटीचा कार्यक्रमाला " सुरवात झाली. Baba Amte
स्नेहभेटीच्या कार्यक्रमाची प्रस्ताविकपर भाषण श्री. राकेश ठाकरे यांनी सुरवात केली. प्रस्ताविक भाषणामध्ये राकेश ठाकरे यांनी जुन्या आठवणीनां उजाला देऊन नव्या आठवणी जाग्या केल्या. श्री.उत्तम चव्हाण यांनी सुत्रसंचालनाचा कार्यभार सांभालत मित्र-मैत्रीनी बाबत प्रेमाच्या, आपुलकिच्या एकमेकांच्या दोन वर्षातील सुरभी विद्यालयात घडलेल्या जुन्या आठवणीना जिवंत केल्या व शायरी व चोरोल्याच्या रूपात मित्र-मैत्रीनीना मनमोहक असे मन जिंकून आनंदमय वातावरण तयार केलं.
आपले प्रत्येक मित्र-मैत्रीनीचा परीवाराचे व मित्राचे एकमेकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. स्वागताबरोबर आपआपले परीचय तसेच सुरभी विद्यालयाचे दोन वर्षाचे अनुभव सर्वांनी आपल्या मनोगतातून कणखर, तडीपार, हास्य रूपात, उपादी केलेल्या कामाची सनद,घडलेल्या जुन्या गाठी भेटी घटना,एकमेकाबाबतचे मौज-मज्जा, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झालेला अनुभव या जुन्या गोष्टीला जिवंत करुन एकदा विध्यार्थी दशेत जाऊन केलं. गेल्या १८-१९ वर्षाच्या गाठिभेठीच्या त्या अविस्मर्नीय आठवणीना अजून एकदा हुबेहूब डोळ्यासमोर ठेवत प्रत्येकांनी आपल्या अनमोल अश्या शब्दातून व्यक्त केल्या.
"स्नेहभेट"या कार्यक्रमाची शेवटची रुपरेषा म्हणजे आभार प्रदर्शन चा सुत्र सौ. वर्षा मानकर यांनी आपल्या मार्मीक अतुलनिय शब्दातून मित्र-मैत्रीनीनी समोर मांडत अशा या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांना धन्यवाद देत कार्यक्रमाची सांगता केली.