गडचांदूर: अंबुजा सिमेंट फाऊंडेशनतर्फे शिक्षक व शिक्षणदान उपक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या मिशन गरूडझेप,या कार्यक्रमाला गती देण्यासाठी शिक्षक, शिक्षणप्रेमी व स्वयंसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला.सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी Ambuja Cement foundation अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे कमर्शिअल हेड संजीवराव होते तर उदघाटन चंद्रपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी केले.यावेळी अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, कोरपना,राजूरा,जिवतीचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुखांची प्रमुखाने उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर असावा,शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन गुणवंत करण्यावर भर असावा तसेच Youtube युट्युब वरील डॉ.सुगाता मित्रा शिक्षण विषयक विचार,यावर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी मनोगत व्यक्त केले.कोरोना काळातील शिक्षण व मंगी (बु) गावाच्या भौतिक विकासात व शैक्षणिक कार्यात अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले असून विकास कार्यात मोठी मदत होत असल्याचे मत रत्नाकर भेंडे यांनी व्यक्त केले. शिक्षणदान कार्यक्रमांतर्गत कार्य करणारे स्वयंसेवक कु.अभिलाशा मेक्षाम बोबडे हरदोना (खु),शैला मडावी मंगी(बु), मनीषा मडावी सालेगुडा,मनीषा पेंदोर सोनापूर,वर्षा लेकलवार भेंडावी,देवुबाई सिडाम कारगाव(खु), फुलबाई सिडाम धनकदेवी यांचा शाल श्रीफळ,मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक मुर्ती रत्नाकर भेंडे मंगी(बु) राजुरा, गिरीधर पानघाटे हरदोना(खु) राजुरा,विट्ठल बक्षी सोनापुर राजुरा,उमेश आडे उपरवाही कोरपना,अशोक गोरे पिंपळगाव कोरपना,क्रिष्णा गर्जे कुकुळसात कोरपना,धनराज सोनवणे भोयगाव कोरपना,वंदना वाटेकर चिंचाळा चंद्रपूर, चंद्रकांत धकाते वडधा वरोरा, गणेशा आसेकर चकलिखीतवाडा गोंडपिपरी, सोनाली ज्ञानवल कुकडहेटी सिंदेवाही,महेंद्र खोब्रागडे नाचनभाटी सिंदेवाही,प्रदिप बिलवणे कोसंबी माल नागभीड यांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम समन्वयक सरोज अंबागडे,किशोर हजारे यांनी केले. संचालन जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील विद्यार्थीनी कु.हर्षदा बोबडे आभार कु.वसुंधरा पायघन यांनी व्यक्त केले.