प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील मौजा कोसंबी येथे ग्राम पंचायत तर्फे सरपंच रवींद्र कामडी यांच्या नेतृत्वात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प करून परिश्रम घेतल्याने आणि शासनाच्या नियमांचे पालन केल्याने तसेच गावकऱ्यांचेही सर्वतोपरी सहकार्य लाभत असल्याने याची पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी योग्य दखल घेऊन कोसंबी ग्राम पंचायतीचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि केलेल्या कार्याबद्दल दिनांक २१/१२/२०२१रोज सोमवारला पंचायत समिती मुल, जिल्हा परिषद, चंद्रपूर च्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार देऊन कोसंबीचे सरपंच रवींद्र कामडी यांचा गौरव केला. हा गौरव वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदया पंचायत समिती सदस्य सौ वर्षाताई लोनबले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रभारी गटविकास अधिकारी पं स.मुल श्री. सुनील कारडवार, जिवन प्रधान विस्तार अधिकारी (पंचायत) पं स.मुल. वैद्य सर आरोग्य विस्तार अधिकारी, नरेंद्र पेटकर सर कृषी विस्तार अधिकारी स्वछ भारत मिशनचे हर्षवर्धन वरभे, सचिन येरमलवार आणि मुल तालुक्यातील सर्व ग्रा.पं चे सन्माननीय सरपंच आणि उपसरपंच यांचेसह अनेक ग्रामसेवक व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कोसंबी ग्राम पंचायतीला ग्राम स्वच्छता अभियान तथा स्वछ ग्राम स्पर्धा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य, आणि तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच, सरपंच संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामसेवक व कोसंबी गावाचे तालुक्यातील सर्व शुभचिंतक यांनी सरपंच रवींद्र कामडी व सर्व मेम्बर आणि ग्राम पंचायत यांचे आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.
