वरोरा - जय हिंद मंडळ वरोराद्वारे आयोजित प्रतिभाताई धानोरकर 'आमदार चषक 2021' या खुल्या कबड्डी स्पर्धेत चुरशीच्या अंतीम लढतीत सोनीपत हरीयाना संघावर मात करीत महाराष्ट्र पोलीस संघाने विजेतेपद पटकाविले.
Violation of rules
वरोरा येथील कॉटन मार्केटच्या मैदानात तयार करण्यात आलेल्या स्टेडियम मध्ये , वरोरा शहरात पहिल्यांदाच मॅटवर हे सामने खेळविण्यात आले. वरोरा परिसरातील क्रीडा रसिकांनी या सामन्यांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
Omicron variant
विजेत्या महाराष्ट्र पोलीस संघास एक लक्ष रुपये रोख व चषक ,द्वितीय विजेत्या सोनीपत हरियाणा संघास 51 हजार रुपये रोख व चषक व तृतीय विजेत्या एकलव्य नागपूर संघास 25 हजार रूपये रोख व चषक देण्यात आले.
मात्र आमदार धानोरकर यांच्या कबड्डी चषक स्पर्धेत उदघाटन समारंभात प्रेक्षक गॅलरी कोसळली, 20 च्या वर नागरिक यामध्ये जखमी झाले, आयोजकांना कोरोना नियमांचा विसर पडला, मात्र दुसऱ्या दिवशीही तेच चित्र या स्पर्धेदरम्यान दिसले, Dj चे बेधुंद तालात युवकांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवीत ठेका धरला. Kabaddi league
एकीकडे राज्यात ओमायक्रोन या नव्या विषाणूची धास्ती असून आतापर्यंत राज्यात तब्बल 8 रुग्ण पोजीटीव्ह मिळाले, तरीसुद्धा प्रशासन अश्या कार्यक्रमांना परवानगी देत आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसाला कॅडलं मार्च काढण्याची परवानगी नाही, मात्र अश्या कार्यक्रमाला परवानगी देत गर्दी ला कोरोनाला निमंत्रण देण्याचे काम प्रशासन तर करीत नाही न असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे.
कोरोनाचे नियम भंग झाल्याने प्रशासन कारवाई करेल का यावर सध्या नागरिकांचे लक्ष लागले आहे, नाहीतर नेत्यांसाठी नियम वेगळे व नागरिकांसाठी वेगळे अशी प्रचिती कुणाला येऊ नये.