प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नफ्यामधून केवळ शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी आणि शेतकऱ्यांचे आरोग्य जोपासून त्यांना आरोग्य मुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम ठेवने हेच CDCC बँकेचे कर्तव्य आहे. यासाठीच शेतकरी कल्याण निधीची तरतूद करण्यात आली असून जमा झालेल्या शेतकरी कल्याण निधीचा उपयोग शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे जीव वाचविण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन मदत देण्यात येत असल्याचेही सांगितले. मुल तालुक्यातील मौजा नलेश्वर येथील अल्पभूधारक गरीब शेतकरी श्री हसतमुख आबाजी वाळके हा अनेक दिवसांपासून कँसरच्या आजाराने त्रस्त असून त्याच्या उपचारासाठी व त्याचा जीव वाचविण्यासाठी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून तीस हजार (३०,०००) रुपये शेतकरी कल्याण निधीमधून help मदत म्हणून रुग्णाला चेक देतांना ते बोलत होते. रुग्णाला आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याची माहिती कांग्रेसचे नेते तथाव बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना प्राप्त होताच संतोषसिंह रावत यांनी नलेश्वर येथे तात्काळ कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या प्रत्यक्ष घरी जाऊन चेक दिला. याप्रसंगी रवींद्र गेडाम,पुंडलिक आलाम, तालुका कांग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते किशोर घडसे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हसन वाढई, सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले, बँकेचे व्यवस्थापक अनिल सिरस्कर, राजेंद्र वाढई, ग्रामस्थ किर्तीवर्धन शेंडे, भाऊराव गेडाम माजी सरपंच भावना वाढई,सदश प्रफुल वाळके,राजेंद्र वाढई तथा नलेश्वर येथील अनेक नागरिक उपस्थित होते. कॅन्सरग्रस्त रुग्णास मदतीची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी बँकेचे सूत्रं हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव बँक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना cancer कँसर सारखे दुर्धर आजार झाल्याने शेतकरी खचतो म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना पुनर्जीवित करण्याचे कार्य करीत असल्याने नलेश्वर ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी संतोषसिंह रावत व बँकेचे आणि समस्त संचालक मंडळांचे आभार मानले आहे.
