प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल -भारतीय राष्ट्रीय स्थापनेचा १३६ वर्ष पूर्ण होऊन १३७ वा वर्धापन दिन मुल तालूका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी कांग्रेस हीच देशाची महाशक्ती आहे. हीच देशाला तारु शकते असे मार्गदर्शन संतोषसिंह रावत यांनी कार्यकर्त्यांना केले. Congress foundation dayयावेळी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राजेंद्र कन्नमवार, महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, नगर सेविका ललिता फुलझेले, संचालक किशोर घडसे, जेष्ठ कांग्रेस पदाधिकारी व सेवादलचे माजी अध्यक्ष गंगाधर घुगरे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, माजी संचालक हसन वाढई,सुरेश फुलझेले, सेवादलचे उपाध्यक्ष मंगेश बततुलवार, शहर कांग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी,उपाध्यक्ष संदीप मोहबे,महासचिव कैलास चलाख, वरिष्ठ कार्यकर्ते विवेक सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले, मुत्यालवार, स्वागत बनकर, गणेश रणदिवे, तुलाराम घोगरे, डॉ. सुरमवार, ग्रामीण कांग्रेसचे धनराज रामटेके, रोहित निकुरे, मनोज बावनपल्लीवार, यांचेसह ग्रामीण व शहरी काॅग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता गण प्रामुख्याने उपस्थित होते.