चंद्रपूर - घोटाळे आणि वादाने नेहमी ग्रस्त असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर विरुद्ध आयुक्त असा सामना रंगला आहे, आयुक्त आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागायला अनेक अडचणी येत आहे, अशी तक्रार महापौर कंचर्लावार यांनी थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सह, आमदार मुनगंटीवार, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मात्र रजेवर जाण्यापूर्वी आयुक्त हे महापौर यांना याबाबत सूचना देण्यास बांधील नाही, पण स्थायी समितीला त्यांना सूचना कराव्या लागतात, मात्र आयुक्त मोहिते यांनी अशी कोणतीही सूचना दिली नाही. Mayor rakhi kanchrlawar
दीड वर्षांपूर्वी आयुक्त राजेश मोहिते चंद्रपूर मनपात रुजू झाले होते, त्या काळापासून आतापर्यंत अनेक घोटाळे चंद्रपूर मनपात झाले मात्र महापौर व आयुक्त यांनी सांभाळत सर्वकाही आलबेल केलं.
मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कोविड काळात आयुक्तांना दिलेले सर्व अधिकार काढून घेण्यात आले. Chandrapur municipal corporation
पुढील काळात आयुक्त विरुद्ध महापौर हा सामना चांगलाच रंगणार.