चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील सुबई-चिंचोली या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी महिला पुरुष तरुण लहान मुलं बाळं नागपूर येथील संविधान चौकात सुरेश मल्हारी पाईकराव बी आर एस पी जिल्हा महासचिव चंद्रपूर यांच्या नेतृत्वात 30 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहे वेकोलि मुख्यालया तर्फे 30 नोव्हेंबरला सायंकाळी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकरी बी आर एस पी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने सर , BRSP जिल्हा महासचिव चंद्रपूर सुरेश पाईकराव उपस्थित होते वेकोलि तर्फे या बैठकीत डब्ल्यूसीएल सीएमडी उपस्थित न राहता ही बैठक पांडे सर या वेगळी अधिकाऱ्यांसोबत पार पडली पण डब्ल्यूसीएल सीएमडी चर्चे दरम्यान उपस्थित नसल्यामुळे समस्येचे समाधान कारक उत्तर मिळाले नाही त्यानंतर वेकोलि तर्फे 2 डिसेंबरला प्रकल्पग्रस्त शेतकरी शिष्टमंडळ आणि बी आर एस पी जिल्हा महासचिव चंद्रपूर सुरेश पाईकराव यांना बोलवण्यात आले या बैठकीमध्ये स्वतः WCL CMD यांची भेट झाली आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी शिष्टमंडळ आणि बी आर एस पी नेते सुरेश पाईकराव यांनी WCL CMD यांना चर्चेदरम्यान प्रश्न केले त्यामध्ये WCL CMD यांनी चूक मान्य करत येणाऱ्या पंधरा तारखेच्या बैठकीत या संदर्भात विचार करू असे सांगितले पण प्रकल्पग्रस्त शेतकरी शिष्टमंडळ आणि बी आर एस पी नेते सुरेश पाईकराव यांनी WCL CMD LA स्पष्ट शब्दात सांगितले जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वेकोलि देण्यात आला..
या 205 शेतकऱ्यांशी 456.75 एकर शेत जमीन दहा वर्षापासून वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात अंतर्गत अधिग्रहीत करण्यात आली यामध्ये वेकोलि तर्फे ऑगस्ट 2010 ला Section 4 लावून गावांमध्ये जनसुनावणी करण्यात आली आणि प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला नोकरी आणि जमिनीचा मोबदला देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले त्यानंतर वेकोलि तर्फे जुलै 2012 ला Section 7 लावण्यात आले नंतर जानेवारी 2014 मध्ये Section 9 लावून जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले त्यानंतर केंद्र सरकारने मार्च 2014 ला Section11 लावून खदान चालू करणे ाकरिता वेकोलि la मंजुरी देण्यात आली अशा प्रकारे 2014 मध्ये जमीन अधिग्रहण कायदा अंतर्गत Section 11 लावून जमिनीचा मालकी हक्क वेकोलि ने मिळवला त्यानंतर 2016 मध्ये वेकोलि तर्फे शेतकऱ्यांना करार नामा करण्यासाठी कागदपत्रे जमा करायला सांगण्यात आले सर्व शेतकऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत वेकोलि सी जी एम ऑफिस धोपटला येथे आपले कागदपत्र जमा केले त्यानंतर वेकोलि तर्फे सांगण्यात आले की लवकरात लवकर करारनामे होऊन जमिनीचा मोबदला आणि नोकरी देण्यात येईल त्यानंतर वेकोलि प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पासून नागपूर येथील संविधान चौकात चिंचोली येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे डब्ल्यूसीएल सीएमडी च्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आज दिनांक 13 डिसेंबर 2021 ला आंदोलनाचा 14 वा दिवस आहे या दरम्यान वेकोलि प्रशासनाबरोबरच दिनांक 30 नोव्हेंबर, 2 डिसेंबर ,8 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर असा चार वेळा झालेल्या सीएमडी आणि आंदोलनातील शिष्टमंडळाला दरम्यान च्या सभेमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी चा आर्थिक मोबदला नोकरी या दोन मागण्या पैकी फक्त आर्थिक मोबदला देण्याचे WCL CMD यांच्याकडून सांगण्यात आले नोकरी देण्याचे वेकोलि तर्फे मान्य केले नाही म्हणून दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी वेकोलि तसेच संबंधित पोलिस स्टेशनला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तर्फे आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले हे आमरण उपोषण दिनांक 13 डिसेंबर 2021 पासून करायचे ठरवले होते निवेदनात 48 तासाची मुदत देण्यात आली आहे आमरण उपोषणात 10 प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसणार आहेत वेळ पडल्यास संपूर्ण 205 प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणास बसतील असा इशारा चंद्रपूर जिल्हा महासचिव बीआरएसपी सुरेश भाऊ पाईकराव आंदोलनाचे नेते यांनी दिला आहे आमरण उपोषणाला दरम्यान काही जीवित हानी - नुकसान भरपाई झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी वेकोलि प्रशासन महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकार यांची राहील.
