गडचांदूर(सैय्यद मूम्ताज़ अली):-
कोरपना तालुक्यात हल्ली काही कॉपीपेस्ट पत्रकारांची पत्रकारीता जोरात सुरू असून व्हॉट्सअप अशा पत्रकारांना अक्षरशः वरदान ठरले आहे.एकना अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सदस्य म्हणून विराजमान ही मंडळी सदैव आयत्या बातम्यांच्या शोधात असतात. किंवा दुसर्याकडून मागलेल्या बातम्या वेळ न दवडता लगेच प्राकाशनासाठी संबंधितांकडे पाठवत असल्याचे दिसून येते आहे.यांच्या अशा कृत्यांमुळे डोळ्यात तेल घालून स्वतः बातम्या लिहिणाऱ्या बिचाऱ्या पत्रकारांची गोची होत आहे.कॉपीपेस्ट पत्रकारांची पत्रकारिता निव्वळ व्हॉट्सअपमुळे सुरळीत सुरू असून या मंडळींनी व्हॉट्सअप निर्मात्याचे उपकार मानावे तेवढे कमीच.असे उपहासात्मक मत व्यक्त होताना दिसत असून संबंधीतांचे वृत्तपत्र सुद्धा अशा प्रतिनिधींच्या बातम्या प्रकाशित करण्यास धन्यता मानत आहे हे मात्र विशेष.copypaste journalists
पत्रकारितेची बाराखडी सुद्धा पाठ नसलेले येथील काही अर्धज्ञानी,चापलूस, स्वतःला पत्रकार म्हणून चारचौघांत मिरवणारे तथाकथित कॉपीपेस्ट पत्रकारांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. "ये तो पब्लिक है,सब जानती है" या म्हणीप्रमाणे यामध्ये कॉपीपेस्ट व प्रमाणीक कोण,यातील फरक जसं वाचकांना कळते, तसं संबंधित वृत्तपत्राच्या जबाबदार मंडळींना कळत नसेल का ! हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे. अवशे,नवशे, लायकी नसलेल्यांनी या क्षेत्रात उडी घेतल्याने प्रामाणिकपणे काम करणार्या पत्रकारांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाने पत्रकारांसाठी योग्य ती शिक्षणाची अट घालावी जेणेकरून अशा कॉपीपेस्ट पत्रकारांवर अंकुश लागेल अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यातील काही जण नोकऱ्या करून पत्रकारिता करीत असल्याने "एकना धड भाराभर चिंध्या" अशी परिस्थिती पहायला मिळत असून यांनी एकतर व्यवस्थित नोकरी तरी करावी,किंवा पत्रकारिताच करावी असा आपुलकीचा सल्ला तालुक्यातील काही सुज्ञ नागरिकांनी दिला आहे.काही का असेना मात्र सध्याच्या परिस्थितीत येथील कॉपीपेस्ट पत्रकारंची पत्रकारिता फक्त आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुपमुळेच बेदरकारपणे सुरू आहे यात तिळमात्र ही शंका नसल्याचे बोलले जात आहे. Whatsapp journalist
