गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील वडगाव,आसन या शेतशिवारातील नाल्यावर गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांच्या मार्गदर्शनात वनराई बंधारा बांधण्यात आला. जमिनीत पाण्याची पातळी Water level वाढावी,पाण्याची साठवणूक व्हावी तसेच "पाणी अडवा,पाणी जिरवा" या शासनाच्या धोरणानुसार सदर बंधारा बांधण्यात आला असून मुख्याध्यापक काळे,पर्यवेक्षक संजय गाडगे,जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे,सुरेश पाटील, राजेश मांढरे,राजेश वासेकर,भालचंद्र कोंगरे, सी. एम. किन्नाके, सी.जे.घाटे,एस.जी.आत्राम, बापूजी मेश्राम,शशिकांत चन्ने यांच्यासह शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी बंधारा बांधकामासाठी परिश्रम घेतले.
