गडचांदूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेतर्फे कामगारांच्या विविध मागण्या घेऊन मनसे mns नगरसेवक चंद्रपूर तथा मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर यांच्या नेतृत्वाखाली नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी समोर मागील 10 नोव्हेंबर पासून महाधरणे आंदोलन सुरू आहे.सदर आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून
कामगार कुटुबांसह या आंदोलनात सहभागी झाले आहे. अजूनही काहिच सकारात्मक घडले नाही. कामगार आपल्या मागण्यांवर ठाम असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. Mns adhikrut
दरम्यान अंतरगाव (बु) युथ एमर्जन्सी सर्विस youth emergency service यांनी सामाजिक दायित्व जोपासत या आंदोलनकर्त्या कामगारांना भोजनाची व्यवस्था केली.दालमिया सिमेंट कंपनी dalmia cement company एक्स कामगार व कंत्राटी कामगारांनी यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या टिमचे सचिन भोयर यांनी सुद्धा कौतूक करत आभार मानले.या उपक्रमात युथ इमर्जन्सी सर्विसचे अध्यक्ष अमोल कळस्कर,सचिव नितीन मडावी,दीक्षा वाघमारे,अपर्णा भोयर,समीक्षा वाघमारे,गायत्री उरकुडे, आकाश चिकाटे,किशोर भोपरे,प्रशांत बावणे व इतरांची उपस्थिती होती.
