चंद्रपूर - देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून कांग्रेस प्रचलित आहे, अहिंसा वादी म्हणून कांग्रेसची देशात ओळख आहे, मात्र क्षुल्लक कारणावरून कांग्रेसच्या मंत्र्यासमोर मारहाणीचा धक्कादायक प्रकार 13 नोव्हेम्बरला घडला.
विविध उदघाटन कार्यक्रम प्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत 13 नोव्हेम्बरला चंद्रपुरात दौऱ्यावर आले होते, कांग्रेसच्या अनुसूचित जातीचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्यांच्या स्वागतासाठी कांग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश मेंढे उपस्थित होते. Maharashtra Pradesh Congress Scheduled Castes Department Vice President
त्यांनी राऊत यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनर वर पालकमंत्री वडेट्टीवार यांचा फोटो नसल्याने कांग्रेसचे माजी नगरसेवक व असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष संदीप सिडाम यांनी मेंढे यांना या कारणासाठी मारहाण केली.
राष्ट्रीय अध्यक्ष राऊत यांच्या समोर सदर प्रकार घडल्याने त्यांचाही पारा चांगलाच चढला, व फोटो नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून असा प्रकार घडणे कांग्रेस पक्षाची संस्कृती नाही असे विधान त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केले.
आधी विश्रामगृहात मेंढे यांच्यासोबत शाब्दिक चकमक सहित मारहाण व किटाळी भटाळी येथील कन्व्हेअर बेल्ट उदघाटन कार्यक्रम स्थळी मेंढे यांना मारहाण करण्यात आली. Beating in front of the minister
याआधी सुद्धा आमदार व खासदार यांच्या वाढदिवसाच्या बॅनर वर पालकमंत्री यांचा फोटो न टाकल्याने कांग्रेस चे संदीप सिडाम यांनी शहरभरात असलेले बॅनर काढून टाकले होते, मेंढे यांच्या या प्रकाराने पक्षातील अंतर्गत वाद रस्त्यावर येऊ नये असे त्यावेळी कांग्रेस कार्यकर्त्यांनी सदर प्रकार हाताळला, मात्र आज पुन्हा तसाच प्रकार घडल्याने कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला असल्याने मारहाणीचा हा प्रकार घडला. Nana patole
चंद्रपूर मनपाच्याया निवडणुक तोंडावर आली आहे, आणि त्यावेळीचं अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षाला मारहाण म्हणजे दलित मतदारांना नाराज करण्यासारखा आहे, इतकेच नव्हे तर मेंढे यांना मारहाण झाल्यावर कांग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर पदाधिकाऱ्यांनी तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही.
ह्या सगळ्या प्रकाराची ऊर्जामंत्री नितीन राऊत पक्षश्रेष्ठी जवळ तक्रार करणार काय हे बघण्यासारखे असणार आहे. सदरील प्रकाराने कांग्रेस मध्ये अंतर्गत वाद उदभवण्याची चिन्हे आहे.
