चंद्रपूर - देश आज अतिशय विदारक परिस्तिथीतून जात असून दडपशाहीचे राजकारण सुरू आहे.सुजाण नागरिक आज बोलण्यास घाबरत आहेत.सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र याही परिस्तिथीतून बाहेर पडण्याचा मार्ग dr.babasaheb ambedkar डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला असून त्यांनी भारताला दिलेले संविधान हेच या सर्व परिस्तिथीत तारणारे असल्याने संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी प्राणाची बाजी लावणे आजची काळाची गरज असल्याचे मत राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे प्रवक्ता ऍड. रफिक शेख यांनी मांडले.
सामाजिक समता संघर्ष समिती चंद्रपूरच्या वतीने संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबरला आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. रेहमत नगर मधील के. जी. एन. हॉल मध्ये 26 नोव्हेंबर ला पार पडलेल्या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष हाजी सय्यद अनवर अली होते तर संविधानाचे अभ्यासक बळीराज धोटे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.सोलापूर येथील सुप्रसिद्ध लेखक सरफराज अहेमद,राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे प्रवक्ता ऍड. रफिक शेख, माहिती अधिकार प्रचार व प्रसार संस्थेचे जिल्हाध्यक्ष नितीन बन्सोड, bhim shakti भीम शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बळीराज धोटे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.त्यांनी देशातील परिस्तिथीवर बोलताना सर्वांनी संविधानाचे महत्त्व समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. Constitution day chandrapur
कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद इरफान शेख यांनी मुस्लिम समाज व आजची परिस्थिती विशद केली.इस्लाम धर्म सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी असून सर्वांनी आता शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन केले. संविधान हेच आज सर्व समस्येवर उपाय असून सर्वांनी संविधानाचे वाचन करावे असे आवाहन केले. यावेळी नितीन बन्सोड, अजय दुर्गे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अध्यक्ष सोहेल रहमान शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून सर्वांना संविधान रक्षणाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धीरज तामगडे,उबेदुल्ला शेख, शाहरुख शेख, कादर शेख, दिनेश लांजेवार, इक्बाल गुलजार शेख,सरफराज खान, सोहेल भाई, रिंकू भाई,बिट्टू भाई,अब्दुल राजीक आदींनी परिश्रम घेतले.

