प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - बल्हारपूर वनक्षेत्रातील कारवा बीटातील कक्ष क्रमांक 500 मध्ये वाघीनीचा शव आढळल्याने खळबळ उडाली आहे.मृत वाघीन पाच वर्षाची असावी असा अंदाज वनविभागाने वर्तविला असून वाघीनीचा मृत्यू चार दिवसापुर्वी झाल्याची शक्यता आहे.वाघीनीचे सर्व अवयव सूरक्षित आहेत.मृत्यूचे खरे कारण आद्याप अज्ञात आहे.दरम्यान तज्ञांच्या मार्गदर्शनात वाघीनीचे postmortem शवविच्छेदन करण्यात आले.वनरोपवाटीकेत शवाला जाळण्यात आले असून व्हिसेरा नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.अधिक तपास वनविभाग करीत आहे. Female tiger death
