चंद्रपूर - बॅनर वर माझा फोटो का टाकला नाही म्हणून पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या इशाऱ्यावर कांग्रेस पक्षात असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मला मारहाण केली, याबाबत मी पालकमंत्री वडेट्टीवार व मारहाण करणाऱ्या विरोधात पक्षप्रमुख सोनिया गांधी व महाराष्ट्र कांग्रेस कमिटी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष महेश मेंढे यांनी सांगितले.
13 नोव्हेंबर ला राज्याचे ऊर्जामंत्री व कांग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांचा चंद्रपूर दौरा होता, मात्र राऊत यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत बॅनरवर पालकमंत्री वडेट्टीवार यांचा फोटो नसल्याने त्यांनी गुंड प्रवृत्तीचे संदीप सिडाम, प्रवीण पडवेकर व मोहन डोंगरे यांना मला मारहाण करण्यासाठी पाठविले.
मंत्री राऊत यांच्यासमोर माझ्यावर पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली, व कार्यक्रम स्थळी मला बेदम मारहाण करण्यात आली असा आरोप महेश मेंढे यांनी करीत या सर्व मारहाणीचे सूत्रधार स्वतः पालकमंत्री विजय वडेट्टीवार आहे असा आरोप लावला. Congress protest
मागील 2 विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली, त्यानंतरही मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत आहो मात्र माझे काम पक्षातील काहींना पचत नसल्याने त्यांनी अहिंसक पक्षात हिंसक वृत्तीला समोर करून मला मारहाण करायला लावली.
असा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर थेट आरोप महेश मेंढे यांनी केला.
15 नोव्हेम्बरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधात महाराष्ट्र कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने निषेध आंदोलन केले. Chandrapur congress
सध्या काही महिन्यावर चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे मात्र त्याआधी कांग्रेस पक्षातील कलह रस्त्यावर आल्याने येणाऱ्या निवडणुकीत कांग्रेसला याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महेश मेंढे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, संदीप सिडाम, प्रवीण पडवेकर व मोहन डोंगरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
