प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - आदिवासी विकास राज्यमंत्री नाम. प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच राष्ट्रवादी कांग्रेस बल्लारपूर विधानसभा क्षेत्र मुल येथील कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, युवक चे जिल्हाध्यक्ष नितीनजी भटारकर सदर भेटीत मूल तालुक्यातील पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून मंत्रीमहोदयांचे उत्साहाने जल्लोशात स्वागत केले. कार्यकर्त्यांचे पक्ष हिताचे मनोबल वाढवीण्या करिता सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जोमाने कामाला लागावेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कार्यकर्त्यां सोबत पाठीशी राहील. असा मार्गदर्शन उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस चे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे पक्ष वाढि करिता प्रयत्न बाबत प्रशांसा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ह्याशिवाय मंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांचे अडचणीचे निवेदन स्वीकारून तात्काळ थेट संबंधित अधिकाऱ्यां सोबत दूरध्वनी द्वारे चर्चा करून सदर अडचण सोडविण्याचा प्रयत्न करून कार्यकर्त्यांना न्याय मिळवुन देण्याचा सुद्धा प्रयत्न केला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने पक्ष संघटन करण्याचा सल्ला दिला व पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी करिता भरभरून शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी होन्या करिता राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका कार्याध्यक्ष गुरदास गिरड कर, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महिला तालुका अध्यक्ष निताताई गेडाम ,युवक चे तालुका अध्यक्ष समीर अल्लूरवार , प्रा, प्रभाकर धोटे, प्रशांत भरतकर, साईनाथ गुंडोजवार, अशोक मार्गनवार, संदीप तेलंग ,अजय त्रिपत्तिवार, मिथुन चिताडे , प्रेमदास उईके ,विनोद गुज्जनवार, आकाश रोहिने, विकास रणदिवे , नंदू बारस्कर, बालाजी लेनगुरे , गुड्डू महाडोळे, प्रदीप देशमुख , दीपक महाडोळे , प्रेमदास उईके, विकास गेडाम, राजू कोवे, मारोती शेंडे,नवनीत चिंचोलकर, संदेश भोयर , वैभव गांगरेड्डीवार,सुमीत मेश्राम ,वैभव भोयर आदि बहुसंख्य कार्यकर्ते सदर कार्यक्रमात परिश्रम करुण यशस्वी केले.
