प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा - 6 नोव्हेम्बरला बल्लारपूर शहरात उभ्या वाहनाने पेट घेतल्याची घटना ताजी असताना पुन्हा आज राजुऱ्यातील रामपूर व विरुर मार्गावरील सुमठाणा फाट्याजवळ चारचाकी वाहन क्रमांक Mh 02 BJ 9755 या चालत्या गाडीत बॅटरीच्या वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने अचानक पेट घेतला.
वाहनचालकांच्या सतर्कतेने तात्काळ पाण्याच्या कॅनने आग आटोक्यात आणली. Fire in moving vehicle
सदर वाहन हे चेतन जनपल्लीवार यांच्या मालकीचे आहे.
