चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या
स्मृतिदिनानिमित्त आयोजित पर्यावरण विषयक जनजागृती कार्यक्रम, युवासेना जिल्हा, चंद्रपुर व रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १७/११/२०२१ ला एंट्रन्स पॉईंट, रघुवंशी कॉम्प्लेक्स, चंद्रपूर येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रक्षण धरणीमातेचे फाउंडेशन (अध्यक्ष) राहुल कोटकर, (उपाध्यक्ष) अविनाश लेंनगुरे, रोहिणी पाटील (उपजिल्हाधिकारी युवती सेना चंद्रपूर) व करन वैरागडे ( शहर समन्वयक युवासेना, चंद्रपुर) उपस्थित होते.
" माझी वसुंधरा " अंतर्गत मार्गदर्शक अविनाश लेंनगुरे यांनी प्लास्टिक प्रदूषण Plastic pollution,जल प्रदूषण,वायू प्रदूषण Air Pollution,होम कंपोस्ट,कचरा विलगीकरण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासोबत निसर्गाचीही जतन केले पाहिजे व ओला कचरा सुका कचरा याचे विलगीकरण करूनच घंटागाडी कडे सोपविला पाहिजे असे सांगितले. त्याचप्रमाणे रोहिणी पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदूषण जल, पृथ्वी, व प्राणी यांना हानी करते व त्याचा परिणाम आपल्या सोबत येणाऱ्या पिढीला सुद्धा भोगावे लागेल व क्लायमेट चेंज याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी मांडली.
राहुल कोटकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले व उपस्थितांचे तसेच एंट्रन्स पॉइन्ट चे संचालक श्री खुजे सर यांचे सुद्धा आभार मानले.
सदर कार्यक्रमास एंट्रन्स पॉईंट चे विद्यार्थी उपस्थित होते.