चिमूर : कोरोना संकटात भांगडीया परिवार यांनी सेवाभावी कार्य केले असले तरी त्या कार्यात आपला ही महत्वाचा वाटा असल्याचे सौ अपर्णाताई भांगडीया यांनी व्यक्त करीत एकनिष्ठ बहिणीमुळे च आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची समाजसेवेच्या माध्यमातून विकासा कडे वाटचाल होत असल्याचे सांगितले.
भाजप महिला आघाडी च्या महिला स्नेहमीलन सोहळ्यात सौ अपर्णाताई भांगडिया, सौ मनीषा भांगडिया, सौ आरतीताई भांगडीया, सौ छायाताई कंचर्लावार,सौ शालिनी हटवादे विद्याताई नाकाडे उपस्थित होते .
दरम्यान उपस्थित महिलांना साडी चोळी भेट देऊन दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे यांनी करीत त्या म्हणाल्या की कोरोना काळात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी समाजसेवेचा वसा ठेवत त्यांनी अन्नदान,आरोग्य सेवा करण्याचे कार्य केले असल्याचे सांगत जनसेवा करणाऱ्या आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या पाठिशी राहण्याचे सांगितले
माजी पस सदस्य वर्षा लोणारकर यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे कर्तव्य आणि महिला विषयी प्रेम यावर प्रकाश टाकला.
माजी नगरसेवक भारती गोडे म्हणाल्या की आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या कर्तव्याची कीर्ती कोणीच थांबवू शकत नाही आणि त्यांची सेवा भावी कार्य करीत आपला लढा पूर्ण केला आणि त्यांच्या सेवा कार्याचे गुणगौरव केले. Mla Bunty Bhangdiya
संचालन पायल कापसे तर कल्याणी सातपुते यांनी आभार व्यक्त केले. तालुक्यातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

