चंद्रपूर - चंद्रपूर कांग्रेस सेवा दल तर्फे संविधान दिनानिमित्त संविधान दौड Marathon competition मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण १३०० विद्यार्थीनी सहभाग घेतला होता त्यामध्ये इंदिरा गांधी विद्यालय यशवंतनगर पडोली या शाळेतील विद्यार्थ्यांनी अ' आणि ब" या गटामध्ये ऋषिकेश सोनवाणे ,हर्षाली वाढई प्रथम ,क्रमांक व वंश दिवसे, नयन देरकर, ओम ढवळे, रोशन वाडगुरे, रितेश मिलमीले यांनी यश पटकावत आपल्या शाळेचा ठसा उमटवला.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.मडावी सर व संपूर्ण शाळेतील गुरुजनांना आणि प्रशिक्षक दर्शन मासिरकर, विजय भगत, प्रकाश नागरकर,यांना दिले. Congress seva dal
सरांनी त्यांचे पुष्गुच्छ देऊन तोंड गोड करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छारुपी आशीर्वाद दिला.
ग्रामीण भागात असलेले अनेक अष्टपैलू खेळाडू हे प्रशिक्षणाच्या अभावी मागे पडले असले तरी दर्शन सारखा आत्मविश्वास असलेला खेळाडू कोणतेही स्वार्थ न बाळगता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असल्याने असे घडून येत आहे .
परंतु या ग्रामीण भागातील विविध खेळात प्रावीण्य असलेल्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम भविष्यात लोकप्रतिनिधीनी केले पाहिजे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
