चंद्रपूर - राज्याच्या पक्षी क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र अनेक पक्षिमित्र संघटनांच्या वतीने ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या आठवडाभराच्या काळात विविध उपक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात येते. ज्येष्ठ वनअभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या (5 नोव्हेंबर) जन्मदिनापासून ते पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या (१२ नोव्हेंबर) जयंतीपर्यंत हा सप्ताह साजरा जातो. २०१७ पासून राज्यात पक्षी सप्ताहाचे आयोजन करणे सुरू झाले. मागील वर्षी महाराष्ट्रभर हा सप्ताह जवळपास २२ जिल्ह्यात व मोठ्या उत्साहात साजरा झाला होता.
या अनुषंगाने आज ५ नोव्हे. रोजी TATR अंतर्गत येणाऱ्या मोहुर्ली वनपरिक्षेत्र (बफर झोन) आणि जंगल जर्नी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोहुर्ली येथे tadoba forest पक्षीनिरीक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात उपस्थित गावकरी, चंद्रपूर वरून आलेले हौशी नागरिक, मोहुर्ली येथील गाईड व लहान मुले यांना पक्षी ओळख, स्थलांतरित पक्षी Migratory birds, पक्षी संवर्धन या विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात RFO श्री. मून सर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती वंदना मून, श्रीमती चित्रा इंगोले यांनी परिश्रम घेतले तर जंगल जर्नी ग्रुपचे सदस्य रितुराज मावळणकर, अर्चना डोंगरे, सुरज गुंडावार, योगिता गुंडावार, प्रमोद इंगोले, मंगला सोनारखन इत्यादींची उपस्थित होती. bird watching
