चंद्रपूर - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 21 व 22 फेब्रुवारी 2021 ला राज्यातील 27 महानगरपालिका शहरातील 102 क्षेत्रात सतत 24 तास निरीक्षण केले, यामध्ये दिवस, रात्र व कार्यालयीन व सुट्टीच्या दिवसांचा सुद्धा समावेश होता.
सदर अहवालात राज्यातील औद्योगिक व वसाहती क्षेत्रात ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे निष्पन्न झाले असून रात्री व दिवसा ही वाढ धोकादायक प्रमाणाच्या बाहेर गेली आहे. noise pollution
या वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होत आहे, दोन दिवसातील या अहवालात चंद्रपूर जिल्ह्यात मर्यादेपेक्षा म्हणजेच 74 ते 68 या दौरा वाढ झाली आहे.
राज्यात रात्रीच्या ध्वनी प्रदूषणातील आघाडीत असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा 7 व्या क्रमांकावर आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम 1980 व ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा 2000 अंतर्गत या प्रदूषण विरोधात कारवाई केली जाते. Night pollution
शहरात सर्वत्र शांतता झोनची विभागणी केली असताना सुद्धा सर्रास या नियमांचे उल्लंघन होत आहे, जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक, विमाने, वाहनाचे कर्कश हॉर्न, लाऊड स्पीकर्स loud speakers, बँड व डीजे हे या प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे.
उपाययोजना म्हणजे कायद्याची कडक अंमलबजावणी, घरात आवाज रोधक उपाय योजना, नियमित हेल्मेटचा वापर, कमी आवाजाची उपकरणे, मास्क व सुरक्षेची उपकरणे इत्यादी सावधानता बाळगल्यास यावर काही प्रमाणात नियंत्रण शक्य आहे.
चंद्रपूर शहरात दिवसा ध्वनी प्रदूषणाचे स्रोत हे सर्वात जास्त जटपुरा गेट परिसरात दिवसा तब्बल 70 डेसीबल च्या वर धोकादायक ध्वनी प्रदूषण, गांधी चौक 68 डेसीबल, वरोरा नाका चौक 65 ते 70 डेसीबल रात्री गांधी चौक 60 डेसीबल च्या वर, जटपुरा गेट 60 ते 65 डेसीबल, वरोरा नाका चौक परिसर 60 ते 65 डेसीबल च्या वर या प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रदूषण हे मानवी शरीरास हानिकारक आहे, या जीवघेण्या प्रदूषणाविरोधात नागरिकांनी सजग होऊन पुढे येत प्रशासनाला या विरोधात तक्रारी करायला हवा असे आवाहन ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी केले आहे.
