गडचांदूर :- बायोडिझेल प्रकरण सध्या अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीसांनी 24 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे एका ट्रांस्पोर्ट कंपनीच्या आवारातील डिझेल साठ्यावर धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी 'कथित बायोडिझेलची' हेराफेरी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सदर धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे.
या ट्रान्सपोर्ट कंपनीकडे सिमेंट उद्योगातील कच्चा माल ने-आण करण्यासाठी अंदाजे 100 हुन अधिक मोठमोठे bulker truck बल्कर वाहन आहे.यासाठी जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावरील 100 किमी अंतरावर असलेल्या वरोरा येथील एका डिझेल पंपावरून दोन टँकर याठिकाणी आले होते.दोन टँकरपैकी एका छोट्या टँकरला कुठलाही वैध परवाना नसल्याचे कळते.बंडू श्रीहरी भोयर रा.नंदोरी व प्रणेश दिपक माले वरोरा (पेट्रोल पंप मालक)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन टँकर व अंदाजे साडे 3 हजार लिटर डिझेल असा एकुण 25 लाख 22 हजाराचा माल पोलीसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.सदर डिझेल हा Biodiesel बायोडिझल असल्याचे स्पष्टपणे सांगता येत नसून यासाठी लॅब मध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार सत्यजीत आमले यांच्यासह पोलीस पथकने सदर कारवाई केली असून डिझेलचे नमुने घेण्यात आले आहे. सदर ठिकाणी महसूल अधिकार्यांची उपस्थिती होती.पुढील तपास ठाणेदार आमले करीत आहे.
चंद्रपुरात इंधनाची कुठलीही माहिती नमूद नसलेले टँकर मोठ्या प्रमाणात आहे, सदर टँकर काही ट्रॅव्हल्स धारकांचे असून ते भरदिवसा ट्रॅव्हल्स मध्ये डीझल भरत असतात, या वाहनांची पासिंग सुद्धा चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे मात्र RTO विभाग यावर जाणून दुर्लक्ष करीत आहे, गडचांदूर येथे पोलिसांनी अश्या अवैध डीझल चा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली आहे, त्यांचे कौतुक करावे तितकेच कमी.
