भद्रावती - जिल्ह्यात रेतिघाटाचे लिलाव बंद असून सध्या रेती माफिया सक्रिय झाला आहे, पांढऱ्या सोन्याची तस्करी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
घाट बंद असल्याने रेती माफियांनी आता नदीपात्रात जाऊन रेती उपसण्याचे काम सुरू केले आहे, ते सुद्धा रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत.
असाच एक तस्कर भद्रावती पोलिसांच्या गुन्ह्यात सापडला मात्र सध्या तो फरार आहे, तेलवासा उकणी गावालगत असलेल्या वर्धा नदी पत्रात रेती माफिया वासुदेव ठाकरे याने जेसीबी, हायवा ट्रक च्या माध्यमातून हजारो ब्रास रेतीचे उत्खनन केले, मात्र ही बाब महसूल प्रशासनाला माहीतच नव्हती.
इतकेच नव्हे तर सदर अवैध रेतीची वाहतूक करण्यासाठी गावाबाहेरून 2 ते 3 किलोमीटर अंतरचा मार्ग या तस्करांनी तयार केला होता. Sand mafia
23 नोव्हेम्बरला भद्रावती गुन्हे शोध पथकाला रेती तस्करीची गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभ प्रसंग लॉन जवळ सापळा रचला व रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक क्रमांक MH34BG8331 ला पोलिसांनी थांबविले, चौकशी दरम्यान त्या हायवा मध्ये तब्बल 5 ब्रास रेतीचा साठा आढळला, सदर गाडीचा वाहनचालक किरण साहू ला अटक करण्यात आली असून हायवा ट्रक हा वासुदेव ठाकरे यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले.
23 नोव्हेम्बरपासून वासुदेव ठाकरे Absconding फरार झाला आहे, भद्रावती पोलीस ठाकरेंचा शोध घेत असून लवकरच तो पोलिसांच्या तावडीत सापडेलचं.
सदर कारवाईत भद्रावती पोलिसांनी 10 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
Auction of sand dunes
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर नदंनवार यांचे मार्गदर्शनात पो.नि. गोपाल भारती, गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार, पोकॉ शशांक बदामवार यांनी केली आहे.
कोरोना काळात वासुदेव ठाकरे यांनी रेती तस्करीत मोठा उच्चांक गाठला होता, त्यावेळी सुद्धा त्याला रेती तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती.
