चंद्रपूर - आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा, जि. चंद्रपुर द्वारा दर वर्षी प्रमाणे यावर्षी दि. १४ नोव्हेंबर २०२१ रविवार ला सकाळी १०.०० ते ५.०० वा. पर्यंत, गौरव सेलिब्रेशन लाॅन, विद्यानिकेतन स्कूल जवळ, नागपुर रोड चंद्रपूर येथे दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग व कर्णबधिर) बांधवांचा उपवधु-वर परिचय मेळावा व समाज कल्याण योजनांचे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नरेंद्रजी (शामबाबुजी) पुगलिया यांच्या सहकार्यातून होत आहे.
आयोजित कार्यक्रमात नागराज गेडाम, सभापती, समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद, चंद्रपूर, सुरेश पेंदाम, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, सुभाष शिंदे, अध्यक्ष डेबु सावली वृद्धाश्रम, चंद्रपूर, श्रिमती. निलोफर अली, समाज कल्याण निरीक्षक, जि.प.चंद्रपूर हे उपस्थित राहणार आहेत.
विवाह संस्था ही समाज निर्मितीत तथा समाज बांधणीत महत्वाची संस्था आहे. प्रत्येक व्यक्तीकरिता त्याचा जोडीदार जन्मास येतो. परंतु त्याचा शोध घेणे तेवढेच जिकरीचे काम आहे. विवाह योग्य मुलीच्या बापाच्या पायातील चपला जिझतात पण योग्य जोडीदार मिळत नाही. त्यातच उपवधू -वर दिव्यांग असेल परिस्थिथी कठीण होते. अशा परिस्थितीत विवाह जोडणीकरिता अनेक व्यावसायिक संस्था मेट्रोमोनीच्या माध्यमातनू काम करते आहेत. परंतु दिव्यांग बांधवांच्या विवाह जोडणीकरिता कोणत्याही संस्थेचे नाव ऐकण्यात नाही. Meet the disabled bride and groom
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा मागील १८ वर्षापासून स्व. गौरवबाबू पुगलिया संगणिकृत दिव्यांग वध-वर सचूक केंद्राच्या माध्यमातनू हे अनोखे काम मोफत करित आहे. या संस्थेतील सदस्य कार्यकर्ते हे दिव्यांग क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य, सामाजिक पुनर्वसन व व्यावसायिक पुनर्वसन कार्य करीत आहेत, याचेच फलीत या संस्थेला मागील १८ वर्षांत ३५० पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांचे विवाह जोडून त्यांचे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजनातनू
विवाह मोफत लावून देण्यात यश मिळाले आहे. तथा सर्व जोडीदार यशस्वीरीत्या आपले वैवाहिक जिवन जगत आहेत. आणि तेच दिव्यांग बांधव संस्थेच्या या यशस्वी कार्यात काम करीत असनू दिव्यांग बांधवाचे विवाह जोडण्याकरिता संस्थेला मदत करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयकुमार पेचे व सचिव श्री. महेश भगत यांनी या आयोजित मेळाव्यात दिव्यांग बांधवानी संम्पूर्ण कागदपत्रासह निर्णय प्रक्रियेत सहकार्याकरिता पालकांनी आपल्या दिव्यांग पाल्यासह उपस्थित राहून विवाह जोडण्याच्या या सामाजिक कामाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
सदर मेळाव्याकरिता महाराष्ट्रसह ईतर ५ राज्यातील 165 दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली आहे.
संम्पर्क-
श्री. संजय पेचे, अध्यक्ष
मो. नं. 7020328769
श्री. महेश भगत, सचिव
मो. नं. 8485889990
Email Id- asthatrust1402@gmail.com
Astha Multipurpose Charitable Trust
