चंद्रपूर - राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मा. ना. ना.नितीन राउुत हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौरयावर दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी येत आहेत. १३ नोव्हेंबर २०२१ रेाजी सकाळी नागपूर वरून चंद्रपूर परिमंडळ कार्यालयात उपकेंद्र लोकार्पण सोहळयानिमित्त आयोजित कार्यक्रमात महावितरणच्या व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निर्माण पूर्ण झालेल्या उपकेंद्रांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.
Power minister nitin raut
मा. उर्जामंत्री यांच्या हस्ते सकाळी १२.३० वाजता चंद्रपूर मंडळांतर्गत निर्मित ३३किव्हो - राजूरा तालुक्यातील अहेरी व देवाडा उपकेंद्र, सावली तालुक्यातील हरंबा, मुल तालुक्यातील मुल एमआयडीसी या दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेमधून निर्मित, चंद्रपूर तालुक्यातील सिदूर या पूर्व विदर्भ विकास योजनेमधून निर्मित तर नेरीखांबाडा या वरोरा तालुक्यामधील उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून तसेच चंद्रपूर मधील समाधीवार्ड उपकेंद्राचे एकात्मिक उर्जा विकास या योजनेमधून निर्मित अशा विविध योजनांतून निर्मित एकूण ७ उपकेंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते आभासी माध्यमातून होणार आहे.
चंद्रपूर जिल्हयात ग्राहकांना शास्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळण्यासाठी दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना तसेच तर एकात्मिक उर्जा विकास योजनेअंतर्गत १५४ कोटी ९१ लाख खर्चून या उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व विदर्भ विकास योजनेतून ३ कोटी ७ लाख तर उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून २ कोटी ३० लाख खर्च करुन या उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
१३ नोव्हेंबर २०२१ दुपारी ३.३० वाजता महानिर्मितीने वेकोलीच्या भटाडी खुल्या कोळसा खानीतून थेट वीजकेंद्रात पाईप कनव्हेअरच्या सहाय्याने कोळश्याची वाहतूक करणारी आधुनिक यंत्रणेचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे.
सदर समारंभाला प्रमुख अतिथी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. विजय वडेटटीवार, उर्जाराज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद चंद्रपूर अध्यक्ष श्रीमती. संध्याताई गुरनुले, विशेष अतिथी म्हणून खासदार श्री.सुरेशभाउु धानोरकर, श्री.अशोक नेते, आमदार- श्री. नागोराव गाणार, डॉ. श्री. रामदास आंबटकर, श्री. अभिजीत वंजारी, श्री.सुधिरभाउु मुनगंटीवार, श्री. किर्तीकुमार भांगडीया, श्री.सुभाष धोटे, श्रीमती. प्रतिभाताई धानोरकर, श्री.किशोर जोरगेवार, तर सन्माननिय अतिथी म्हणून प्रधान सचिव उर्जा दिेनेश वाघमारे, मा.श्री.विजय सिंघल (भा.प्र.से), अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण, मा. श्री. अजय गुल्हाने (भा.प्र.से) जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मा. डॉ. मिताली सेठी (भा.प्र.से), मुख्य् कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर मा. श्री. संजय ताकसांडे, संचालक (संचलन) महावितरण, मा. श्री. सतिश चव्हाण संचालक (वाणिज्य्) महावितरण, मा. श्री. रविंद्र सावंत संचालक (वित्त्), महावितरण मा. श्री. भालचंद्र खंडाईत संचालक (प्रकल्प्ा/मासं), महावितरण, श्री. प्रसाद रेशमे कार्यकारी संचालक (प्रकल्प्), महावितरण, मा. श्री. अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (वितरण) महावितरण, मा. श्री. सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक, महावितरण, नागपूर हे निमंत्रित आहेत.
काय्रक्रमाचे विनीत म्हणून मा. श्री. सुनिल देशपांडे मुख्य् अभियंता, चंद्रपूर परिमंडळ, महावितरण, मा. श्रीमती संध्या चिवंडे अधिक्षक अभियंता, महावितरण (चंद्रपूर मंडळ) मा. श्री. सुहास मेत्रे अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) महावितरण, राकेश जनबंधु अधिक्षक अभियंता (स्थापत्य), महावितरण, नागपूर यांची उपस्थिती असणार आहे.
