प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - पाणी आडवा पाणी जिरवा या शासनाच्या सूचनेनुसार व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिने मुल तालुक्यातील मौजा चिखली येथे कन्हाळगाव देवस्थान पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यावर श्री.वसंत डोनुजी मंडलवार यांच्या शेताजवळ चिखली ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आपल्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यासाठी ग्राम पंचायत उपसरपंच दुर्वास कडस्कर, माजी सरपंच तथा सदश लहुजी कडस्कर, ग्रामसेविका प्रीतिताई चिमुरकर, कृषी सेवक मानकर मॅडम, तलाठी गायकवाड मॅडम, शामरत चुदरी, पुरुषोत्तम कडस्कर, दीपक घोगरे, सुभाष मडावी, स्वनिल नवघडे, किशोर कुलसंगे,किशोर मेश्राम, प्रकाश कडस्कर,सुरज मंडलवार, रामदास चुदरी, रोजगार सेवक सुखदेव कडस्कर,शिपाई धनराज कडस्कर, कविष मडावी, यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित राहून श्रमदान केले. बांधण्यात आलेल्या वनराई बंधारा हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा व उपयोगाचा असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात असून चिखली ग्रामस्थांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले जात आहे.
