मूल प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष Cdcc bank chandrapur तथा माजी जी. प.अध्यक्ष कांग्रेस नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटीचे नवनियुक्त गटसचिव संतोषसिंह रावत यांचे हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार, संचालक तथा विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, कांग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, राजू मारकवार,महिला कांग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, नगर सेविका ललिता फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते विवेक मुत्यालवार, सुरेश फुलझेले, माजी उपाध्यक्ष चंदू चतारे, गणेश रणदिवे, सहकारी सोसायटीचे सचिव संजय बददेलवार, यांचे सह तालुका व युवक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बळकटी करणासाठी तालुका व शहर कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आताच कामाला लागावे असे आव्हान बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी यानिमित्ताने कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त चंद्रपुरात कांग्रेस सेवादल तर्फे फळवाटप
चंद्रपूर - दिनांक २ ऑक्टो २०२१ रोज शनिवार ला सकाळी १०:०० वा प्रा. सूर्यकांत खनके अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी Mahatma Gandhi व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री Lal Bahadur Shastri यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे सौ.स्वाती त्रिवेदी अध्यक्ष महिला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी श्री.संजय बिजवे उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल श्री.भुपेंद्र खनके उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल सौ लता बारापात्रे अध्यक्ष महिला चंद्रपूर शहर काँग्रेस सेवा दल श्री.षडानन पहानपटे सोसियल मीडिया प्रमुख चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल Adv.राहुल मेंढे अध्यक्ष चंद्रपूर यंग ब्रिगेड, श्री.सागर वानखेडे अध्यक्ष चंद्रपूर तालुका काँग्रेस सेवा दल श्री.विनोद ताजने,सौ.मंगला शिवरकर व सर्व सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.