मूल प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - १ ते ७ ऑक्टोबर हा सप्ताह वन्यजीव सप्ताह सर्वत्र पाळण्यात येते  याच दिनाचे औचित्य साधून ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असून यावर्षी अमृत महोत्सव कार्यक्रम असल्याने दुहेरी कार्यक्रमाची सुरुवात वनपरिक्षेत्र अधिकारी मूल (बफर) यांच्यातर्फे मुल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. अमृत महोत्सवा Amrit Mahotsav निमित्य वाघांच्या संरक्षणाच्या उद्देशाने छत्तीसगढ राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प, अचानक व्याघ्रप्रकल्प, सीतानदी उदंती व्याघ्रप्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या रॅली समवेत सकाळी ११ वाजता मुल नगरात आगमन झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी वणाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. वन्यजीव Wildlife व वंनसंरक्षण आणि मानव-वन्यजीव संघर्ष Human-wildlife conflict या विषयावर  वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले. वन्यजीव सप्ताह निमित्याने संजीवनी पर्यावरण संस्था,मुल यांच्यातर्फे छायाचित्र प्रदर्शनी व उत्कृष्ट अभिनय पथनाट्य सादर केले.  सदरची रॅली महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पातून जाणार असल्याने दिनांक १ आक्टोंबर रोजी दुपारी २-०० वाजता पुढील कार्यासाठी मार्गस्थ करण्यात आले.                                              या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे Tadoba Andhari Tiger Project संचालक डाँ. जितेंद्र रामगावकर साहेब, विभागीय वनाधिकारी एम.भागवत साहेब, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे सहाय्यक वनसंरक्षक बी.सी.येळे, व वनपरिक्षेत्र कार्यालय मुलचे क्षेत्रीय कर्मचारी तसेच छत्तीसगढ राज्यातून आलेले वनविभागाचे उपसंचालक मेहेर साहेब, सहसंचालक अग्रवाल, कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाला पी.आर.टी.टीम.एस.टी. पी.एफ.टीम.व महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, आणि संस्थेचे पदाधिकारी,सदश,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मुलचे वनपरिक्षेत्र अधिकारी जि.आर.नायगमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पाडण्यात आला.
