प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष cdcc bank chandrapur president तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बँकेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच अतिशय अल्पावधीत बँकेच्या नियमात धोरणात्मक बदल करुन बँकेला bank आर्थिक दृष्ट्या प्रगती पथावर नेल्याने आणि शेतकऱ्यांसाठी अनेक विकासाच्या योजना हाती घेऊन शेतकऱ्यांचाही विकास साधत असल्याची शासन स्तरावर दखल घेऊन संतोषसिंह रावत यांची महाराष्ट्र राज्य गटसचिव सेवायोजन सहकारी सोसायटी पुणे
Maharashtra State Group Secretary Employment Co-operative Society Pune या राज्यस्तरीय संस्थेवर नागपूर महसूल विभागातून संचालक म्हणून निवड केल्याबद्दल चांदा जिल्हा गटसचिव संघटना आणि जिल्ह्यातील सर्व गटसचिव, आणि संस्था सचिव व समस्त कर्मचारी यांच्यातर्फे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन संतोष भाऊ यांचा भावपुर्ण सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष श्री.अजय मालोदे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, संघटनेचे उपाध्यक्ष श्री. संजय बददेलवार, सरचिटणीस श्री. जगन दुर्गे, संचालक मोहन राजनकर, सचिव ज्ञानेश्वर गटगल, दिवाकर दुर्गे, उत्तम चाटे, धीरज शेंडे, यांचेसह अनेक सदश, कर्मचारी वृंद उपस्थित होते.