गडचांदूर :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून सर्व व्यवहार ठप्प होते.आता मात्र हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.कोरोनाचे corona नियम घालून शासनाने बंदी उठवली.याच श्रेणीत शाळा,महाविद्यालय सुध्दा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.इतर शहरारांप्रमाणेच गडचांदूर येथेही स्थानिकांसह लगतच्या गाव, खेड्यातून शाळकरी मुले मुली शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येत आहे.मात्र शाळा सुटल्यावर बसच्या प्रतिक्षेत असलेले शाळकरी मुली व इतर महिला प्रवाशांना बसस्थानक bus stand परिसरात सक्रिय रोडरोमिओ मुलांच्या टोळीकडून कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.ठाणेदारांनी याकडे जातीने लक्ष देऊन सदर प्रकारावर अंकुश लावावा अशी मागणी सर्वसामान्यांतुन होत आहे. Road Romeo
गडचांदूर शहरात मोठ्याप्रमाणात शाळा,महाविद्यालय विविध शासकीय निमशासकीय कार्यालय असून जवळपासच्या गाव खेड्यातून शेकडो मुली याठिकाणी येतात.मात्र शाळा सुरू झाल्यापासून बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलींना काही गुंडप्रवृत्तीचे रोडरोमिओ मुलांची टोळी यांना विविधप्रकारे नाहक त्रास देत असल्याचे अनुभवास येत आहे.एखाद्याने विरोध केला तर शिवीगाळ करत मारहण केल्याची घटना सुद्धा घडत आहे. harassment of school girls
विविध कार्यालयात काम करणारी महिला व मुलींना सुद्धा यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून बसस्थानक परिसरात पोलीस नेमण्याची मागणी होत आहे.
