Facebook updates - गुरुवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन नावाची घोषणा करण्यात आली. यापुढे फेसबुकला 'मेटा' meta या नावाने ओळखले जाणार आहे.
अनेक दिवसांपासून फेसबुकचे facebook नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. अधिकृत रित्या त्याची घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेला रिब्रॅण्डिंग असे म्हणतात. फेसबुक रिब्रॅण्डिंगच्या माध्यमाने इन्स्टाग्राम Instagram, व्हॉट्सॲप whatsapp आणि ऑक्युलस असे ॲप्स एकाच छताखाली येतील.
ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अनेक देशांमध्ये कंपनीवर प्रश्न उपस्थित होत असताना, प्रक्षोभक मजकूर थांबत नसताना फेसबुकने हे नाव बदलले आहे. भारत सरकारने फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया कंपनीद्वारे वापरल्या जाणार्या अल्गोरिदम आणि प्रक्रियांचा तपशील मागवला आहे. Rip Facebook
कंपनीने नाव जाहीर करताना मेटाव्हर्सची नेमकी काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील सगळ्यांसमोर मांडली आहे. मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन online विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्च्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल.
