प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - झाडीबोली साहित्य मंडळ ग्रामीण चंद्रपूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कवीयित्री तथा मुलच्या नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांच्या शब्दरिंगण दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुल येथे झाले. कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक जेष्ठ नागरिक नामदेवराव कोरडे यांच्याहस्ते झाले.अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.डाँ.सुदर्शन दिवसे, भाष्यकार म्हणून झाडीबोलीचे केंद्रीय सदश ग्राम गीताचार्य बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर,सिनेट सदश सुनील शेरकी,प्रभाकर भोयर,मंजुळाबाई कोरडे,आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कवयित्री प्रा.रत्नमाला भोयर,यांनी केले.समारंभाध्यक्ष डाँ.दिवसे यांनी लेखन करतांना मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता प्रमाण भाषेच्या प्रभावाने दबून न जाता झाडीबोलीतीलच शब्दात लेखन करावे .व बोलीचे सौंदर्य जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवर्जून सांगितले. भाष्यकार ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी शब्दरिंगण या काव्यसंग्रहातून प्रा. भोयर यांनी निसर्ग कवितासोबत काव्यात्मक पद्धतीने मूल्यव्यूहना इजा न करता मनाची गुढे उकलून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे शब्दरिंगण मधील हायकू रचनांना तन्मययतेची चढती कमान असल्याचे म्हणाले. याप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने अरूण झगडकर,सुनील पोटे,लक्ष्मण खोब्रागडे,भरती तितरे, प्रीती जगताप,यांना रत्नप्रभा साहित्य काव्यलेखन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवीचे काव्यवाचन कवीयित्री सविता झाडे,पिसे,यांच्या अध्यक्षतेखाली कवियित्री प्रभा चौथले, मुख्याध्यापिका सुनीता बुटे यांच्या उपस्थितीत पार पडले. यात संतोष मेश्राम, परमानंद जेंगठे,मनीषा पेंदोर,संगीता बढे,सविता कोटी, स्मिता बंडगे,लीना भुसारी,नेत्राम इंगळकर, नागेंद्र नेवारे,मंगला गोंगले, अर्जुमन शेख,अरूण घोरपडे, किरण चौधरी,उपेंद्र रोहनकर, रामकृष्ण चनकापुरे, इत्यादींनी काव्यरचनांचे सादरीकरण केले.संचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे व प्रीती जगताप यांनी केले तर आभार कवियित्री संजीवनी वाघरे यांनी मानले.
