सावली : सावली येथील आठवडी बाजारात भरधाव चारचाकी वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू झाला तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. मार्कंडी शंकर मोहूर्ले (70) रा. खेडी असे मृतकाचे नाव असून दशरथ कावरु रा. सिंदोळा (60), सोमेश्वर डोमाजी मोहूर्ले (36) रा. कापसी हे गंभीर जखमी आहेत तर कांताबाई बिभीषण कन्नाके (53)रा. किसाननगर, छायाबाई राजू काळे (55) रा. मुल असे किरकोळ जखमीचे नाव आहेत. गंभीर जखमी झालेल्या अपघात ग्रस्तांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. Accident
Mh 34 A 0375 हे चारचाकी मारुती वाहन सिंदोळा मार्गाने सावलीकडे येत होते. आज सावली येथील आठवडी बाजाराचा Weekly market दिवस असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. प्रत्यक्षदर्शी च्या म्हणण्याप्रमाणे वाहन भरधाव वेगात Vehicle loading speed असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कार चक्क फळांच्या ठेल्याला धडक देऊन पाच नागरिकांना चिरडले. पाचही जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा दाखल भरती करण्यात आले. खेडी येथील मार्कंडी शंकर मोहूर्ले याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास सावलीचे ठाणेदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनात सहा. फौज. बोधे, लाटकर, वाहतूक विभागाचे सहा. फौज.दादाजी बोल्लीवार, वाहतूक शिपाई विशाल दुर्योधन करीत आहेत.
