पोंभुर्णा - ३०/१०/२०२१ रोजी पोंभुर्णा येथे पहिल्यांदाच शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. Shivsena
पोंभुर्णा तालुक्यात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये शिवसेनेला घवघवीत यश आले त्यानंतर तालुक्यात शिवसेनाचा वाढता प्रभाव बघता पोंभुर्णा येथे सामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यास कार्यालय अपेक्षित होते तेच लक्षात घेता पोंभुर्णा तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांच्या संयोगाने आज तो दिवस उजाडला मुख्य म्हणजे इतक्या वर्षाच्या काळात कधीही पोंभुर्णा तालुक्यात जन संपर्क कार्यालय नव्हते परंतू शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात हे शक्य झाले.
आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये संपूर्ण तालुक्याचे केंद्र बनून शिवसेनेची ताकद पुन्हा वाढणार.
तालुक्यातील समस्या बाबत कही निवेदन सादर करण्यात आले त्या समस्या लवकरच मार्गी लागणार आणि सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार.
या प्रसंगी संपूर्ण शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांची उपस्थिती होती.
