गडचांदूर :- इंधन दरवाढीने उच्चांक गाठले असून सर्वसामान्यांना याचे चटके सहन करावे लागत आहे.दिवसेंदिवस होत असलेली इंधन दरवाढ लक्षात घेता हल्ली डिझेल diesel चोरी व काळाबाजारीचे प्रकारण सुद्ध वाढत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर गडचांदूर भोयगाव मार्गावर विराजमान टायर पंक्चरच्या दुकानातील काही दुकानदार अवैधरीत्या डिझेल साठवणूक करून विक्री करत असल्याची गंभीर बाब अनेकदा संबंधीत पोलीसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर क्षेत्र हे गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून काही दिवसांपूर्वी येथील एका पंक्चर Puncture दुकानदारावर कारवाई करण्यात आली होती.तरीपण या अवैध धंद्यावर अंकुश लागलेला दिसत नसून पुन्हा जोरात सुरू आहे.या मार्गावरील सिमेंट cement, कोळसा Coal वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांचे चालक स्वत: डिझेल काढून यातील काही टायर पंक्चर दुकानदारांना अतिशय अल्प दरात विकतात आणि ही मंडळी याची साठवणूक करून एका मालवाहू टेम्पोद्वारे जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागात तसेच कोरपना तालुक्यातील पारडी,परसोडा सह इतर दुर्गम ठिकाणी असलेल्या वाहनांना व जेसीबी मशीनला योग्य दरात नेऊन देत असल्याचे कळते.टायर पंक्चर दुकानाच्या नावाखाली इंधन विक्रीचे सर्व नियम धाब्यावर बसवून येथील काही दुकानात सर्रासपणे अवैधरीत्या डिझेलची साठवणूक व विक्री होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.विशेषत: रात्रीच्या अंधारात रात्रभर हा अवैध धंदा सुरू असते.मात्र असे असताना संबंधीतांकडून नेहमी दुर्लक्ष करून थातूरमातूर कारवाई करून तोंडाला पाने पुसली जात असल्याचे आरोप होत आहे.गडचांदूर येथे नव्याने रूजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदारांनीच आता याकडे जातीने लक्ष देऊन यासर्व पंक्चर दुकानाची व्यवस्थित झडती घेऊन या अवैध प्रकारावर कायमस्वरूपी अंकुश लावण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
