चंद्रपूर - शहरातील चर्चित व अपघातग्रस्त मार्ग म्हणजे वरोरा नाका, आधी दोषयुक्त असलेल्या उड्डाणपूलावर 50 च्या वर नागरिकांचे अपघातात बळी गेले, त्यानंतर प्रशासनाला जाग येत पुन्हा नव्या उड्डाणपुलाच बांधकाम करण्यात आले. Pitted path
पुलाचे नामकरण सुद्धा करण्यात आले, स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल या पुलावर आंबेडकर कॉलेज कडे जाणारा एक भाग सुरू करण्यास बांधकाम विभागाला वर्ष लागले. Balasaheb Thakrey Flyover
पुलाच्या त्या भागात प्रेमी युगलांचे अश्लील चाळे सुरू झाले, व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला, त्यानंतर तो अर्धवट भाग 15 ऑगस्ट 2021 ला सुरू करण्यात आला.
स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरील रस्ते कुणीतरी सुप्रसिद्ध अभियंत्याने बांधले असतील याच उदाहरण पुलावरून गाडी नेल्यास तेव्हा आपल्याला कळेलच.
जिल्ह्याचा विकास हा सुसाट होत असल्याचा दावा करणारे जनप्रतिनिधी यांनी पुलावरील खड्डे बघितल्यास लक्षात येईल.
उड्डाणपुलाला सुरू होऊन 2 वर्षे सुद्धा लोटले नाही मात्र पुलावरील रस्ते खड्डेमय झाले आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही. Development of pits
शहरातील रस्त्यांनी आधीच खड्ड्यात जीव सोडला असून आता उड्डाणपुलावरील रस्त्यांची ही तीच दुरावस्था झाली आहे. Flyover
उड्डाणपुलावरून वाहन नेल्यास तुम्ही खड्डे चुकवून पुढे जाऊ शकत नाही कारण वाहन खड्ड्यात टाकल्याशिवाय पुढे जाता येणारचं नाही, असे खड्डेमय दृश्य तुम्हाला त्या पुलावर गेल्यावर कळेल.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपलेच आहे असे म्हणणारी शिवसेना सुद्धा या खड्डयांविषयी मौन आहे, शिवसेनेतून कांग्रेसमध्ये प्रवेश केलेले खासदार बाळू धानोरकर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार सारखे ताकदवर नेते सुद्धा खड्ड्यामुळे जीव गेलेल्या मार्गावर लक्ष देतील का? हा अनुउत्तरीत प्रश्नच आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर आपल्याला खड्ड्याचा विकास कसा असतो हे समजेल...