मूल (प्रतिनिधी/गुरू गुरनुले)
ओबीसीं नेत्यांच्या पाठीमागे ईडी, इन्कमटॅक्स income tax लावून त्यांना संपवणारी भाजपा लोकशाहीच्या संविधानावर वरवंठा फिरवून कट कारस्थान रचणाऱ्या भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन ओबीसींच्या नेत्यांनाच आता पुढे करीत मतांसाठी जागरण अभियान राबवित आहे. करिता ओबीसी जनतेनी भाजपा पासून सावध राहावे असे आवाहन ओबीसींचे राष्ट्रीय नेते ना. छगन भुजबळ यांनी केले. ED
अखील भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने मुल येथील कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित केलेल्या अभिनंदन सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करतांना बोलत होते. ना. छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांचे वारस कुठेही ह्यात नसतांना काही मंडळी फुल्यांचे वारस असल्याचे उभे करून समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. समाजकारण करतांना शरद पवार सदैव समोर असतात परंतु काही मनुवादी मंडळी समतेचे चक्र उलटे फिरविण्याचे काम करीत आहेत. या मंडळी पासुन ओबीसी समाजाने सावध राहावे असे आवाहन करतांना ना. भुजबळ यांनी राज्य सरकारला इंपेरीकल डाटा देण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. माझ्यावर १०० कोटीच्या महाराष्ट्र सदनाचे maharashtra sadan कामात ८५० कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा अफलातुन आरोप करून आपणांस नाहक ञास दिला. परंतु सदर प्रकरणात न्यायालयाने आपणास दोषमुक्त केल्याचे सांगतांना ना.भुजबळ यांनी सत्तेपासुन वंचित असलेली भाजपा महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाहक ञास देत असल्याचे सांगितले. लोकहीताच्या योजना आणि प्रकल्प आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकणारे केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय आणि महागाईत वाढ करून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप करतांना ना. भुजबळ यांनी केला. भाजपाने जातीचे राजकारण न करता केवळ ओबीसी संवर्ग डोळ्यासमोर ठेवुन ओबीसींची मुठ घट्ट आवळा. असे आवाहन ना. भुजबळ यांनी केले. कारण दिघे देश विकत आहेत तर दोघेजण देश आहेत याला आवर घाला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्याध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी चंद्रपुरात निघालेल्या ओबीसी मोर्चाचा obc morcha संदर्भ देत बल्लारपुर विधानसभा क्षेञ ओबीसी संवर्गाला देण्यासाठी ना. भुजबळ यांनी प्रयत्न करावे. अशी विनंती केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जी.प. सदश प्रा. रामभाऊ महाडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा अ. भा.महात्मा फुले समता परिषदेचे samta parishad चंद्रपूर जिल्हा (पुर्व विभागाचे) जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी समता परिषदेच्या आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सादर करीत ओबीसींच्या आरक्षणासाठी नाम.भुजबळ साहेब यांची आक्रमक भूमिका व चळवळ यावर देखील प्रकाश टाकला. ना. भुजबळ यांच्या प्रथम आगमनाप्रसंगी अ. भा.समता परीषद जिल्हा कमिटीच्या वतीने ना. भुजबळ साहेब यांचे अभिनंदन करीत सन्मानचिन्ह, फोटो व शाल श्रीफळ देऊन भावपुर्ण सत्कार केला. तर चंद्रपूर जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने निघालेल्या ओबीसी मोर्चाचे यशस्वी नेतृत्व करणारे एवढेच नव्हेतर कोरोना महामारीत कोरोना रुग्णांची मोफत सेवा करणारे जिल्ह्यातील पहिले डाँ.राकेश गावतुरे व डाँ. अभिलाषा गावतुरे या दाम्प्त्यांचा ना. भुजबळ साहेब यांचे हस्ते गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समता परीषदेचे कार्याध्यक्ष बापु भुजबळ, विभागीय अध्यक्ष दिवाकर गमे, समता परिषदेचे सचिव रविभाऊ सोनवणे, दत्ताभाऊ खरात, राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, अँड.बाबासाहेब वासाडे, अ. भा.समता परिषदेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष जगदीश जूनघरी, दत्ताभाऊ खरात, जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, डाँ. राकेश गावतुरे, डाँ.अभिलाषा गावतुरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित व स.प.चे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. सूत्र संचालन माजी नगर सेवक गुरू गुरनुले यांनी केले. तर ईश्वर लोनबले यांनी आभार मानले. यावेळी अ.भा.स.परिषदेचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांचेसह नागरीकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डाँ. राकेश गावतुरे, डाँ.अभिलाषा गावतुरे यांचे अमूल्य सहकार्य लाभले. नियोजनासाठी गंगाधर कुणघडकर, मंगेश पोटवार, हसन वाढई, राकेश ठाकरे, युवराज चावरे,देवराव धवस,राकेश मोहूर्ले, आडव्होकेट प्रशांत सोनूले, प्रा.नामदेव जेंगठे, विवेक मंदाडे,ओमदेव मोहूर्ले, समीर अल्लूरवार, विजय गुरनुले, सौरभ वाढई, रामभाऊ चौधरी, गौरव शामकूळे, पुरुषोत्तम कुनघडकर, नंदू बारस्कर, मधुकर मोहूर्ले,अशोक येरमे, सद्गुरू ढोले, संजय चौधरी, तौशिफ सय्यद, प्रतीक गुरनुले, विक्रांत मोहूर्ले, नितेश रसे, भुजंग ढोले, रामदास ठाकरे, सुभाष मोहूर्ले, सीमा लोनबले, प्रा.अर्चना चावरे,किरण चौधरी,माधुरी गुरनुले,शारदा शेंडे,जया धवस,उषा चुदरी,ओमलता लेनगुरे, सौ.रणदिवे, सौ.मासिरकर, यांचेसह युवक कार्यकर्यांनी परिश्रम घेतले.
