चंद्रपूर - शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह व अतिविशिष्ट विश्रामगृहाच्या दुरुस्तीकरणाचे 16.50 लाखांचे काम ई-निविदे शिवाय करण्यात आल्याने सार्वजनिक विभागात भ्रष्टाचार झाल्याचे निर्दर्शनात आले आहे.
कामाचे निविदा न काढता काही विशेष कंत्राटदारा सोबत संगनमत करून काम पूर्ण केले आहे.
22 ऑक्टोम्बरला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी त्या कामाच्या निविदेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुमरे यांना विचारणा केली असता त्यानी उडवा उडवीचे उत्तर दिले, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घोळ उघडकीस येऊ नये यासाठी त्याच दिवशी 22 ऑक्टोम्बरला सायंकाळी 6.55 वाजता निविदा वेबसाईटवर अपलोड केली, व 29 ऑक्टोम्बरला निविदा उघडणार होती मात्र निविदा वेबसाईटवर टाकण्यापूर्वी काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. Pwd Chandrapur corruption
आपल्या मर्जीच्या कंत्राटदारांना काम देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू आहे, मात्र निविदा न काढता काम आधी मग निविदा काढण्याचा प्रकार म्हणजे इतर कंत्राटदारांना कामे देण्यासाठी वेठीस ठेवणे होय, सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक वर्षांपासून नोंदणी करण्यात आल्या मात्र काम मर्जीतल्या कंत्राटदारांना देण्याचे काम बांधकाम विभागातील अधिकारी व अभियंते करीत आहे.
झालेल्या या घोळात सामील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने देत दोषींवर गुन्हे दाखल करावे अन्यथा शिवसेना आपल्या पध्दतीने अश्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी प्रशासनाला दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.
