गडचांदूर :- केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने देशातील जनतेला वेठीस धरले असून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे.सत्तेत येण्यापुर्वी दोन कोटी लोकांना रोजगार, महागाईवर नियंत्रण असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते.मात्र असे काहीच घडले नाही.दिवसंदिवस महागाई उच्चांक गाठत असून गोरगरिबांना जीवन जगणे अक्षरशः कठीण होऊन बसले आहे.महागाई नियंत्रणात आणण्यासाठी असफल ठरलेल्या मोदी सरकाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २० आक्टोंबर रोजी कोरपना व गडचांदूर येथे तिव्र निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. Petrol diesel price hike
कोरपना येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहेल अली यांच्या नेतृत्वात दिनेश चांदेकर,अकुश सौदागरे, शहेबाज अली, दिलीप मडावी,विनोद मेश्राम, मोबीन बेग, नादीर कादरी,सुरज पवार,अशपाक शेख, शंकर कोटरगें,प्रवीण जाधव यांची उपस्थीती होती. तसेच गडचांदूर येथे आकाश वराटे,आसीफ किडीया, मयूर एकरे,वैभव गोरे,सलीम शेख,निखील एकरे,करण सिंघ, सादीक शेख,मेघराज एकरे,सूरज पिंगे,बादल पेचे, सदानंद गिरी, विनेश देठेकर इत्यादींची उपस्थिती होती.
