चंद्रपूर/दुर्गापूर - जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्व युवकांच्या हाती आल्याने जिल्ह्यात शिवसेनेचा जनाधार वाढत आहे.
सध्या ग्रामीण व शहरी भागात शिवसेना पक्षात विविध पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे, यामुळे शिवसेनेची ताकद वाढत आहे. Shivsena chandrapur
दुर्गापुरातील कांग्रेसचे मातब्बर नेते ग्राम पंचायत चे माजी सरपंच सुज्योत नळे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने दुर्गापुरात कांग्रेसला मोठा धक्का बसला आहे. Durgapur congress
दुर्गापुरात शिवसेना पक्षाचा जनाधार वाढविण्यात नळे यांचा पूर्णसहभाग असेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
