कोरपना :- समता,स्वातंत्र्य,बंधूत्व,न्याय,मानवतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्माचे प्रेषित संस्थापक "हजरत मोहम्मद पैगंबर" यांची जयंती "जश्ने ईद ए मिलादुन्नबी" Celebrate Eid a Miladunnabi कोरपना तालुक्यात मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने साजरी करण्यात आली.या पवित्र सणाच्या निमित्ताने कोरपना येथील जामा मशीद कमिटीच्या वतीने विशेष पूजा(नियाज़ फा़तेहाखानी), रॅली व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते."सरकार की आमद मरहबा" रॅली दरम्यान देण्यात आलेल्या या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.कौमी एकता मंच,स्टुडंट फोरम ग्रुपतर्फे मौलाना शेर खान, कमिटीचे अध्यक्ष असरार अली,नवाज शेख यांचा सत्कार करण्यात आला.रक्तदान शिबीरात हिंदू,मुस्लिम युवकांनी मोठ्यासंख्येने सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिला. बातमी लिहिस्तोवर ५० च्या जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.
सैय्यद सुहेल अली,अनील देरकर, शारीक अली, अॕड.मुसळे,शहेबाज़ अली, अभिषेक तुरणकर,मोबीन बेग,अमोल लोडे,लतीफ शेख,पवन बुरेवार,नदीम शेख, रितीक बोरडे,मोहब्बत खान,अजय झाडे, साजीद अली इत्यादींनी सक्रिय सहभाग नोंदवला.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समूहाने रक्त संकलन केले.उपविभागीय पोलीस अधीकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ढाकणे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.संचालन सुहेल अली तर आभार कृपाल कोल्हे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात मोठ्यासंख्यने युवक,बाल गोपाल व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तसेच गडचांदूर व बिबी येथे हजरत मोहम्मद पैगंबर दिन मोठ्या उत्साहात पण शांततेत पार पाडण्यात आला. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता याठिकाणी रॅली काढण्यात आली नाही.मशीदीत सकाळी विशेष पूजा आयोजित करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.गडचांदूर येथे मौलाना हसनैन रजा़ तर बिबी येथे मौलाना सैय्यद शहेबाज़ यांच्या मार्गदर्शनात विशेष पूजा पार पडली.या दोन्ही ठिकाणी मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती. एकुणच हा सण मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला.
