प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - पोलीस स्टेशन बल्लारशा चे वतीने बल्लारशा/बामणी येथील नागरिकांना सूचित करण्यात येते की पुढे होणारे दीपावली सनानिमित्य ज्या नागरिकांना बाहेर गावी जाणार असल्यास त्यांनी कृपया आपले घरी मौल्यवान वस्तू (सोने,चांदी,हिरे) किंवा पैसे ठेऊ नये तसेच स्वतःचे घराचे प्रवेशद्वार मजबूत तसेच कुलूप कडी कोंडा मजबूत लावावा तसेच दरवाज्याचे पुढे किंवा पाठीमागे लोखंडी ग्रील लावावे तसेच बाहेर गावी जाताना आपले घर शेजारी याना माहिती द्यावी तसेच सतत मोबाईल वर संपर्कात रहावे तसेच आपण बाहेर गावी जाताना आपले घरचा संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक पोलीस स्टेशन बल्लारशा येथे माहिती दयावी जेणेकरून पोलिसांना गस्त दरम्यान सदर घरास भेट देऊन पाहणी करता येईल. कृपया वरील सूचनांचे पालन करावे जेणेकरून मालमत्तेचे रक्षण करता येईल.
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन बल्लारशा