घुग्घूस - दि. 24 आँक्टोंबर ला, घुग्घूस गावातून होणारी कोळशाची जड वाहतूकीमुळे होणारे प्रदुषण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या हानीकारक young chanda brigade परिणामामुळे ही जड वाहतूक गावाच्या बाहेरून व्हावी यासाठी वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आज यंग चांदा ब्रिगेड चे नेते ईम्रान खान यांनी आठवडी बाजार, मिरची मार्केट येथे दुसर्यांदा ट्रकांची होणारी वाहतूक रोखली. आणि यानंतरही जर का जड वाहतूकीचा मार्ग गावाच्या बाहेरून नाही काढला तर उपोषणाचा ईशारा ईम्रान खान यांनी दिला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे स्वप्नील वाढई, पराग आकुलवार,प्रितम भोंगळे, नागेश तुरानकर, कुणाल सावे, उपस्थित होते.
