चंद्रपूर - जिल्ह्यात अवैध सावकारांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांकडून जादा व्याज आकारणी करून त्यांना लुटण्याचे अनेक प्रकार घडत आहे. Illegal moneylender
सावकारी परवाना नसलेले अनेक अवैध सावकार व्याजाच्या नावाने डेली वसुली करीत असून यावर प्रशासनाने आळा घालण्याची गरज आहे.
आज चंद्रपूर रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे अशोक दुधे यांच्याघरी सहकार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता त्यांना दुधे यांच्या घरी मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, विविध बँकांचे पासबुक, गहाण पावती, खरेदी दस्त व रोख रक्कम 80 हजार रुपये जप्त करण्यात आले. Deputy registar
सदरची कारवाई महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत करण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक धोटे यांच्या आदेशावर सहायक निबंधक डी.यु.शेकोकार, सरपाते, भोयर, चौधरी, भिम्रतवार, सरिता दरने सह पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
उपनिबंधक कार्यालयाच्या या धाडीने अनेकांचे धाबे दणाणले आहे मात्र आजही असे अनेक अवैध सावकार विना परवाना नागरिकांतर्फे जादा व्याज घेत त्यांना लुटत आहे, सदर अवैध सावकार आजही मोकाटच फिरत आहे.
