अमरावती - अमरावतीत महामार्गाचं लोकार्पण आणि भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही घोषणा करीत विदर्भातील अन्य शहरांच्या आशा पल्लवित केल्या आहे. Nitin Gadkari
नागपूर शहरात मेट्रोचा विस्तार वाढण्याचे काम प्रगतीपथावर असून आता मिनी मेट्रोने विदर्भातील काही शहरे जोडण्यात येणार अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. Mini Metro
पुढील दीड वर्षात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी economy डब्याचे प्रवास दर बस प्रवासा इतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.
