चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय समोर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आले.
यापुढेही या आंदोलनाची दखल न घेतल्यास नागरिकांच्या स्वाक्षरी अभीयान राबवून दारु दुकान स्थालांतर करण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट समोर
मुख्य रस्त्यावरील आनंद वाईन शॉप, तुकूम येथील मंगेश बिअर बार देशी दारू दुकान रस्त्यावर असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. Liquor shop नागरिकांना येणाऱ्या-जा करने अडचणीचे झाले आहे. अपघात वाढले आहे. दारू दुकानामुळे रस्त्याने महिला, शाळकरी मुलींचे छेडखानीचे घटना वाढल्या आहे. या तीनही दुकानांमुळे कायदा व सुव्यवस्थ तसेच शांततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या गैरसोयीकळे शुल्क विभाग, महानगरपालिका शहर पोलिस, वाहतूक विभाग, जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहे. दोन महिन्यापासून मनसे चंद्रपूर शहर नागरिकांसोबत आंदोलन,निवेदन देत आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दारू दुकानदारासह मिलीभगत करून मनसे पदाधिकार्यांवर व गुन्हे दाखल करीत आहे. प्रशासन दारू दुकानामुळे होणारा नागरिकांना त्रासाबाबत, मनपा, वाहतूक विभाग पोलिस आपले कार्यव्य बजावत नाही. या शहरात दारु दुकानदारांचे राज्य आहे. असे दिसून येत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्य उत्पादन शुल्क विभागात मनसे चंद्रपुर शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात भजन आंदोलन करण्यात आले. यापुढे नागरिकांच्या स्वाक्षरी अभीयान राबवून दारु दुकान स्थलांतर करावे यासाठी मतदान घेण्यात येणार आहे.असा आंदोलनाचा इशारा मनदीप रोडे यांनी दिला.
आंदोलनात पदाधिकारी मनसे शहर सचिव सुमित करपे,शहर उपाध्यक्ष बाळा चंदनवार,महिला शाखा अध्यक्ष संगीता धात्रक,संदीप अरडे,नितीन बावणे, नितेश जांभुलकर,राहुल मडावी, अधर मिश्रा, राकेश हनुमंते,विक्की हत्तीमारे,राम सारवा, प्रशांत खामत, मोहित पारीख,प्रकाश कांबळे,प्रथमेश रामटेके, बंटी कास्तावार,अमोल क्षीरसागर,इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.

