प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल : संस्थापक अध्यक्ष डाँ. विश्वनाथ कराड यांनी निर्माण केलेल्या पुणे येथील नामांकित एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी MIT World Peace University मधुन येथील ऐश्वर्या संतोषसिंह रावत हीने हाँस्पीटल अँड हेल्थ केअर मँनेजमेंट Hospital and Health Care Management विषयात मास्टर आँफ बिझनेस अँडमिनीस्ट्रेशन विद्याशाखेची पदवी द्वितीय श्रेणीत प्राप्त केली आहे. नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कुलगुरू डाँ. रविकुमार चिटणीस यांनी ऐश्वर्या रावत हीचा सुवर्ण पदक gold medal देवुन सन्मान केला आहे. सन्मानप्राप्त ऐश्वर्या रावत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची कन्या आहे. ऐश्वर्या हीने आपल्या यशाचे श्रेय आई वडीलांसह भाऊ रूपलसिंह आणि गुरूजणांना दिले आहे. तीच्या यशाबद्दल तीचे सर्वञ कौतुक केल्या जात आहे.