चंद्रपूर - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात युवासेना जिल्हा चंद्रपुरच्या वतीने विविध ठिकाणी सायकल रॅलीचे आयोजन युवासेना प्रमुख , तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरन,पर्यटक मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव मा. वरूनजी सरदेसाई साहेब मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यव्यापी सायकल रॅलीचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात होत असून चंद्रपुर जिल्हयामध्ये विविध ठिकाणी चंद्रपुर शहर, राजरा,बल्लारपुर, गडचांदुर, घुग्गुस,पोंभुर्णा या ठिकाणी सायकल रॅली दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२१ सकाळी १०:०० वाजता पासून निघणार आहे.
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल petrol disel price hike दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. सर्वसामान्य जनतेचे हाल करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ आयोजित सायकिल मोर्चा मध्ये सर्व शिवसेना, युवासेना,महिलाआघाडी,युवती सेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे अशी विनंती युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी केली आहे.
