प्रतिनिधी/गुरू गुरनुले
चंद्रपूर, मुल / :- जिल्ह्याच्या मूल तालुक्या अंतर्गत येत असलेल्या येरगाव येथील एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील ध्रुव संजय गालपेल्लीवार वय वर्ष 14 असे होते. तो आपल्या वडिलासोबत शेतावर शेती ला पानी द्यायला गेला असता 5 वाजेच्या सुमारात ध्रुव याला विषारी सापाने 2 वेळा चावा घेतला. The snake took a bite
तात्काल त्याला उप जिल्हा समान्य रुग्णालय मुल येथे भरती केले. तिथुन पुढिल उपचारा करिता जिल्हा समान्य रुग्णालय चंद्रपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यांत आले हाेते. रुग्णालयात योग्य उपचार वेळीच न मिळाल्याने तसेच शासकीय रुग्णालयातील कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे व जिल्हा समान्य रुग्णालयात सर्प दंश औषधी उपलब्ध नसल्याने त्याचा पहाटे ला मृत्यू झाल्याची दुखदायक घटना आज घडली. दरम्यान यंग चांदा ब्रिगेड आघाडीच्या टीमने प्रत्यक्षात जाऊन रुग्णालयात भेट दिली.व झालेल्या संतापजनक प्रकरणाची सखोल चौकशी तसेच शासकीय रुग्णालयातील प्रत्येक कामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेड आदिवासी आघाडीचे young chanda brigade जिल्हाध्यक्ष जितेश कुलमेथे यांच्या मार्गदर्शनात, विजय foundation चे संचालक अजय दुर्गे यांनी केली.
या वेळी साहिल समुंद, प्रदीप दासरवार, चंद्रशेखर चिताडे, पवन वाकडे, सचिन महोरकर व यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
